नातेपुते(श्रीकांत बाविस्कर) -सध्या कोरोना या रोगामुळे संपूर्ण जगावर संकट आले असून राज्यातही सर्वत्र संचारबंदीमुळे कामधंदा, व्यापार व्यवसाय बंद असल्याने नातेपुते परिसरात हातावर पोट असलेली घरे काही कामधंदा करू शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 


   हे पाहून सुरेश पांढरे परिवाराच्यावतीने नातेपुते येथे जीवनावश्यक अन्न धान्य - साखर-,शेंगदाणे तेल-,तूर-,चहापत्ती, साबण घरगुती सामानाचे किट अशा अनेक वस्तूंचे वाटप केले आहे .सदरचे वाटप सुरेश पांढरे व पांढरे परिवाराच्यावतीने त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घरोघरी जाऊन गरजवंतांना उपासमारीच्या आणि महामारीच्या संकटकाळात पोहचवण्यासाठी परिश्रम घेतले.


 
Top