पंढरपूर - कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.त्यामुळे हातावरले पोट असलेल्या अनेक कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कोरोना विषाणू मुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे . 
  त्यामुळे या देशाला कोरोनापासून वाचव अशी प्रार्थना कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलच्यावतीने विठ्ठल उपासना बडवे मंदिर येथे करण्यात आली.

   या प्रार्थनेनंतर पंढरपूरात कोरोनामुळे अडकून पडलेल्या आश्रितांना व अंधअपंग वृद्धाना फलाहार वाटप करण्यात आला, अशी माहिती कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्त्तात्रय बडवे यांनी दिली.दत्तात्रय बडवे यांनी नुकतीच मुख्यमंत्री निधिसाठी ३१ हजार रुपये इतकी रक्कम आपल्या पेन्शनमधून देणार असल्याचेही जाहीर केले आहे.
 
Top