या चाचणीची सुरुवात ज्येष्ठ विक्रेते, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांचेपासून करण्यात आली. डॉ वृषाली पाटील, विशाल जपे यांच्या पथकाने covid-19 थर्मल स्क्रीनिंग ही चाचणी केली. यात सर्व विक्रीत्याची प्रकृती तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाले.
पंढरपूरचे प्रांत सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या covid-19 थर्मल स्क्रीनिंग चाचणीकामी पुढाकार घेऊन सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची चाचणी पार पाडली.
पंढरपूर शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते यांची प्रकृती तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्याने पंढरपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने वृत्तपत्र वाचक, ग्राहक यांना सर्व वृत्तपत्र विक्रेते यांचेवतीने आव्हान करण्यात येते की डब्ल्यू एच ओ (जागतिक आरोग्य संघटनेने) वृत्तपत्रापासून कोरोना संसर्ग होत नसल्याचे सांगितले आहे. संसर्ग रोगचे साथीबाबत सर्वत्र विक्रेते यांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी बंद केलेले वृत्तपत्र घेणे चालू करावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष महेश पटवर्धन, सचिव विकास पवार, राज्य संघटना कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी केली आहे.