पंढरपूर - कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील दगड खडी फोडून उपजीविका करणाऱ्या दगडफोड्या कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने गावकामगार तलाठी विजय जाधव, सरपंच बाबूशा धोत्रे, ग्रामसेवक सुभाष येलपले, यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर,चहा पावडर इत्यादीचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे जाहिर केलेल्या संचारबंदीने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.


शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असला तरी अजून हा पुरवठा नियमित सुरु झाला नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.


यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,पोलीस पाटील दौलतराव जाधव, शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार,सहकार सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौगुले,ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर खिलारे, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.
 
Top