भाळवणी,(प्रशांत माळवदे)- महाराष्ट्र राज्यातील नाशिक , जळगाव,धुळे,नंदुरबार,शिरपूर,सोलापूर , कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद,बुलढाणा,ठाणे येथून अनेक सामाजिक जाणीव असणारे नागरिक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या कोरोना विषयक प्रबोधन मोहिमेमध्ये सामील होत आहेत.हे सर्व मिशन देशभर अमळगावच्या मनीषा चौधरी अमळगाव,अमळनेर येथून चालवीतआहेत 

      देश अडचणीत असताना आपण गप्प कसे बसायचे? आपल्याकडून ज्या ज्या लोकांना जशी मदत करता येईल तशी करतच राहणार असे मनीषा चौधरी यांनी सांगितले. डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात हिरिरीने काम करीत आहे. फाऊंडेशन प्रामुख्याने ३ मिशन्स वर काम करीत आहे. 

१) मिशन हम्म ( होम मास्क मेकिंग मिशन . हि मिशन कोरोना पासून संसर्ग टाळून नागरिकांमध्ये मास्क घालण्याचा प्रसार करणे आणि जास्तीत जास्त महिलांना घरात मास्क बनवून इतरांसाठी कमीत कमी १० मास्क बनवून मोफत वाटण्या साठी आहे. आजपर्यंत १५० पेक्षा अधिक महिला या उपक्रमात सामील झाल्यात आणि २०,००० पेक्षा जास्त नागरिकांना मोफत मास्कचा फायदा मिळाला. मास्क बनविणाऱ्या आणि मोफत वाटणाऱ्या प्रत्येक महिलेस डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे डिजिटल प्रमाणपत्र पाठविण्यात आले. 

२) मिशन करूणा - लॉक डाऊन चा वेळ जसजसा वाढत जातोय अनेक गरीब कुटुंबांच्या २ वेळेच्या जेवणाचा प्रश्न बिकट होत चाललाय . रोजंदारी , मोलमजुरी करणारे, परप्रांतीय यांना या मिशनमधून दोन घास मिळावे हा या मिशन चा हेतू. तसेच जास्तीत जास्त दानशूर लोकांना प्रेरित करावे जेणे करून अधिकाधिक गरजूंना याचा फायदा होईल. आम्ही धान्य ,किराणा,भाजीपाला , तयार जेवण याचे वाटप करणाऱ्या प्रत्येकास डिजिटल प्रमाणपत्र देतोय.त्यांचे कार्याची दखल घेतोय आणि कोरोना संकटानंतर या सर्वांचा कलाम कुटुंबियांचे उपस्थित सत्कार करणार आहोत.

३) मिशन देवदूत - या मिशनअंतर्गत आम्ही डॉक्टर्स ,पोलीस ,मीडिया ,सफाई कामगार, आरोग्यसेवक यांचे आभार मानून त्यांना डिजिटल आभारपत्र पाठवीत आहोत.त्यामुळे त्यांचा उत्साह वाढविण्यास मदत होईल. आभारपत्र पाठविलेल्या सर्वांचा कलाम सर यांचे नातू यांचे हस्ते सत्कार करण्यात येईल. 

     एकंदरीत काय समाजातील प्रत्येक घटकास विविध मिशनद्वारे मदत करण्याचे अखंड काम डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन करीत आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचे नातू रामेश्वरम येथून या सर्व सामाजिक कामावर लक्ष ठेवून आहेत . कोरोना संकट दूर झाल्यावर कलाम सर यांचे नातू नासिक येथे येणार असून मिशनमध्ये सामील झालेल्या जागृत नागरिकांचा सत्कार त्यांचे उपस्थित करण्यात येईल .सर्व मिशन अजून सुद्धा सुरु असून जास्तीत जास्त लोकांनी या विविध मिशनमध्ये सहभागी होऊन देशसेवा करावी असे आवाहन मनीषा चौधरी या करीत आहेत. ज्यांना कुठल्याही कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९५४५९३८९३८ यावर संपर्क करावा.
 
Top