शहरात येणाऱ्या वाहनांचे होणार निर्जंतुकीकरण
        पंढरपूर - खरीप हंगाम सुरु होणार असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते यांची कमतरता भासणार नाही यासाठी कृषि विभागाने योग्य नियोजन करावे अशा सूचना  प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.तसेच पंढरपूर शहरात जिवनावश्यक वस्तू घेवून येणाऱ्या प्रत्येक वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचेही ढोले यांनी सांगितले.

      कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत नवीन भक्त निवास,पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

     या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, सहाय्यक उपनिबंधक एस.एम.तांदळे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे तसेच कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

       यावेळी प्रांतधिकारी ढोले बोलताना म्हणाले, अन्न सुरक्षा महत्वाची असल्याने, कृषि विभागाने तालुक्यात अन्नधान्य लागवडीची चळवळ निर्माण करावी. यासाठी खरीपात आवश्यक असणाऱ्या बी-वियाणे, खते यांचे नियोजन करावे.शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समितीने पर राज्यातून व पर जिल्ह्यातून आलेल्या वाहनांची माहिती नगरपालिकेला द्यावी. तसेच वाहन शहरात येण्यापूर्वी त्याचे नगरपालिकेने वाहनांचे निर्जंतुकी करण करावे. वाहनासोबत आलेल्या ड्रायव्हरची व क्लिनरची आरोग्य तपासणी करावी. माल उतरविणाऱ्या हमालांना बाजार समितीने पासेस द्यावेत. त्या पासधारकांची माहिती नगरपालिकेला द्यावी अशा सूचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

      पंढरपूर शहरात तीन  दिवस जनता कर्फ्यु असल्याने तसेच अक्षय तृतीयाचा सणामुळे खरेदी साठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.भाजीपाला , आंबे,फळे विक्रेत्यांनी नगपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच विक्री करावी. नागरिकांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही  प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी केले.   

    तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्या साठी प्रशासनाच्यावतीने पंढरपूरात निश्चित करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटर, हेल्थ सेंटर व डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाने आवश्यक आरोग्य सुविधेची पाहणी करावी असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.
 
Top