पंढरपूर (विजय काळे ) - सध्या संपूर्ण देशात कोरोना या विषाणूच्या आजाराने थैमान घातले आहे .महाराष्ट्रातही अनेक बाधीत झाले आहेत.
सद्य परिस्थितीत कोरोना विरूध्द लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या लढ्यात प्रशासनातील डॉक्टर, नर्सेस पोलीस बांधव यांनी कोरोना विरोधात जो लढा उभा केला आहे त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून पंढरपूरचे अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्सचे व्यवस्थापक सागर कमले व कमले कुटुंबियांच्या वतीने एक लाखाचा निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज पंढरपूर शहराचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. 


येणाऱ्या काळात लवकरात लवकर या रोगाचा नायनाट होवो हीच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करून सर्व नागरिकांना सुरक्षित राहा , आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या, महत्त्वाचे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका व प्रशसनास सहकार्य करा असे आवाहन सागर कमले यांच्याकडून करण्यात आले.

  यावेळी अतुल लिमकर ,सुहास गुराडे ,सुरज पेंडाल,गणेश चौधरी, सुरज गंगथडे,सागर घोडके, विनायक लटके ,नागेश थिटे ,सचिन साळुंके , अक्षय नवत्रे आदी उपस्थित होते.
 
Top