पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील सर्व नागरीकांची स्क्रीनींग टेस्ट घेण्यात येत आहे. आज दि. १८-४-२०२० रोजी प्रभाग ५ मध्ये सहकार चौक, कुंभार घाट येथील नागरिकांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली.हा उपक्रम करत असताना टेस्ट करण्यासाठी आलेल्या व या कोरोनाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या डाॕ.वृषाली पाटील, विशाल जपे व त्यांचे सर्व सहकारी तसेच उपस्थित सफाई कामगार व पोलिस कर्मचारी यांचे मंडळाच्यावतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 


हा उपक्रम करत असताना सर्व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले. 


    याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव सर, नगरसेविका श्रीमती सुप्रियाताई डांगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर , माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, डाॕ.मिलिंद जोशी,ह.भ.प बाळासाहेब देहूकर महाराज, माजी नगरसेवक नाना कवठेकर, संजय जव्हेरी, सौ.नातू मॅडम,मुरलीधर भट्टड,वैभव अभंगराव, सोमनाथ अभंगराव, आप्पा अभंगराव  आदी उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top