पंढरपूर - पंढरपूर पोलीस ठाण्याचेवतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १४५ मोटार सायकल व ०७ चारचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. 


     या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासन सज्ज आहे, त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारण असल्या शिवाय बाहेर पडू नये असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे आणि पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.


 पंढरपूरात संचारबंदी लागू असतानादेखील काही नागरिक बाहेर पडत असून नागरिकांकडून पोलिस आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आहेत. पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत विविध भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे १४२ मोटारसायकल आणि ०७ चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करत ही वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कोरोना रोगाच्या आपत्तीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे .कोरोना संसर्गजन्य रोग असून सामाजिक संपर्क टाळणे हे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करून त्या काळात घरातच थांबून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व विनाकारण फिरणे टाळावे असे आवाहन पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे
 
Top