नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-नातेपुते येथे जागतिक महामारी कोरोना या रोगामुळे निर्माण झाल्यामुळे सध्या सगळीकडे लॉकडाऊन असल्या कारणाने सामान्य माणसाचे हाल होत आहेत.या परिस्थितीची जाण ठेवून चंद्रप्रभू सहकारी बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेच्यावतीने अन्नधान्याचे वाटप संस्थेचे चेअरमन राजेश चंकेश्वरा व संचालक मंडळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच माऊली पाटील मित्र मंडळ व अहिंसा सेवा समिती यांच्यावतीने जे मोफत जेवण नातेपुते येथे दिले जाते त्यासाठी संस्थेने एक दिवसाच्या जेवणाचा खर्च म्हणजे तेराशे लोकांना जेवणाचे किटचे वाटप करण्यात आले. 
 
Top