अलिबाग - रायगड जिल्हा १०८ रूग्णवाहिका व्यवस्थापनाचे अभिनंदन करतो, कारण जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त संशयित रुग्णास मुबंई येथे आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त मास्क आणि हँड गोल्ज वापरून डॉक्टरअजित बर्गे , पायलट प्रशांत पाटील, व्यवस्थापन अधिकारी इंद्रजीत माने यांनी नेले. 

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री टोपे यांनी १०८ रुग्ण वाहिकेचे साधारण ३२०० कर्मचारी यांचाही विमा उतरवावा आणि सुरक्षा पोशाख त्यांना द्यावा. कारण तेहि रात्रंं दिवस राज्यभर काम करीत आहेत त्यामुळे अशी विनंती आहे की यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे यांनी लक्ष घालून त्यांच्या  आरोग्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी रायगड भूषण,जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील, आपत्ती व सुरक्षा तज्ञ यांनी केेली आहे. 
 
Top