नातेपुते, (श्रीकांत बाविस्कर)- कोरोना या रोगा मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नातेपुते ,ता. माळशिरस गावामध्ये श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यामार्फत औषध फवारणी करण्यात आली. यामध्ये दळवी गल्ली ,शेख गल्ली ,धनगर गल्ली,सम्राट चौक,बडवे गल्ली,आहिल्यादेवी चौक,कोष्टी गल्ली, बाजार रोड या ठिकाणी करण्यात आली.


  यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी सर्वाना विनंती करून घरा बाहेर पडू नका ,काळजी घ्या असे आवाहन केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मल्हारी गवळी उपाध्यक्ष आदेश पवार व सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top