पंढरपूर -पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस या रोगाविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचे समवेत  उपनगराध्यक्ष तथा पक्ष नेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर समवेत बैठकीचे आयोजन केले होते. 

 यावेळी नगरपरिषदेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. आमदार प्रशांत परिचारक यांनी कोरोना व्हायरससंबंधी नगरपरिषदेने विविध उपाययोजना चांगल्या राबविल्या असून अजूनही परजिह्यातुन मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत आहेत त्यावर लक्ष ठेवण्यात यावे,शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेले आहे. तसेच नगर परिषदेनेही नागरिकांच्या हितासाठी २२ एप्रिल ते २४ एप्रिल ३ दिवस शहर बंद करण्याचे आवाहान केले आहे त्यानुसार पंढरपूरातील नागरिकांनी कोरोना व्हायरसची साखळी तोडणेसाठी स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला आहे. या बंद काळात किंवा ३ मे पर्यन्तचा लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील ५ स्वयंसेवकाची नागरिक सहाय्यता दक्षता समितीची स्थापना करावी तसेच आपल्या प्रभागातील नागरिकांची वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून व आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक रिक्षा नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध करुन द्यावी . कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या प्रभागातील नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व त्यांना घरपोच अत्यावश्यक सेवा उदा. भाजीपाला, दुध,मेडिकल,आरोग्य सुविधा किंवा अडचणीच्या काळात मदत करणेसाठी स्वयंस्फूर्तीने चांगले काम करीत असलेल्या व समाजसेवेची आवड असलेल्या ५ स्वयंसेवकांची नियुक्ती मुख्याधिकारी यांचे पूर्व परवानगीने नगरसेवकांनी करावी व या स्वयंसेवकांमार्फत नागरिकांना सर्व सेवा उपलब्ध करुन द्याव्यात असे सुचना दिल्या. तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सर्व नगरसेवक व नागरिक सहाय्यक दक्षता समिती मध्ये समन्वय ठेवत ज्या नागरिकांना अडचणी असतील त्या सोडविणेबाबत प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच गेले एक महिना पासून शहरातील सर्व व्यवहार व दुकाने बंद आहेत व या दुकानात काम करणा-या कर्मच्या-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदर दुकानदारांनी संबंधीत कर्मचा-यांना माणुसकीचे दृष्टीने त्यांनी केलेली सेवा पाहता या अडचणी चा काळात त्यांना पगार अदा करणेबाबत आपल्या स्तरावर सुचना द्याव्यात असे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना सुचना दिल्या. शहरात कोणीही उपाशी राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. 

  यावेळी नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूर शहरात असणा-या सर्व कार्यालये, हॉस्पिटल सॅनिटायझरद्वारे निर्जंतुकीकरण केले असल्याचे सांगून ८ थर्मल स्क्रनिंग मशिनद्वारे आतापर्यंत १० हजार नागरिकांची तपासणी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिम व फवारणी करण्यात येत असल्याचे सांगितले.८६ कर्मचाऱ्यां द्वारे १७ पथके केली असून त्याद्वारे शहरात नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरात कोणी अनोळखी व्यक्ती किंवा बाहेर गावाहून कोणी व्यक्ती आल्यास त्वरित नगरपरिषद चे मुख्याधिकारी किंवा उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी केले आहे.
 
Top