पंढरपूर,(प्रतिनिधी)- जनतेला आव्हान करतो की ११एप्रिलला क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीला ज्ञानाचा दिवा तर १४ एप्रिलला डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला संविधानाचा दिप लावून ही जयंती साजरी करा. महात्मा जोतिबा फुले आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनो वायरसचे सावट आहे. यामुळे यावर्षी जयंती साधेपणाने आणि प्रत्येकांनी आपल्याच घरीच साजरी करावी,असे आवाहन शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी आहे .या दिवशी आपल्या घरावर रोषणाई करा,दिवे लावा मात्र सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करू नका.सर्वांनी घरीच सुरक्षित रहा,गर्दी टाळू या,अंतर राखू या आणि महात्मा जोतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू या कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जनतेने महात्मा जोतिबा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी, असे आवाहन शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केले.
 
Top