पंढरपूर ,(प्रतिनिधी) -कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र शासनाच्यावतीने डाॅकडाऊन व जिल्हा बंदी असल्याने या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात अडकून पडलेल्या भाविक, नागरिक व मालगाडीचे ड्रायव्हर व गरजू व्यक्तींना काँग्रेस ओबीसी विभाग,पंढरपूर शहर आणि महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने गेल्या १९ दिवसांपासून शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी व संध्याकाळी मसाला राईस,चहा वाटप करण्यात येत आहे.

     सदरचा उपक्रम राबविण्यासाठी पंढरपूरातील व्यापारी नाना ठिगळे , प्रविण कौलवार, आप्पा गङम, अभिजीत कौलवार, बालाजी देशमाने , यशवंत चव्हाण, निलेश आमरे मेंबर यांच्या सहकार्याने २६ मार्च पासून सुरूच आहे.
 
Top