नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)- चैञ शुध्द अष्टमीला
नातेपुते येथे वार्षिक यात्रा ग्रामदैवत श्रीगिरजापती शंभू महादेवांचा विवाह सोहळा,भवानी उत्पती योगावर मानकर्याच्या उपस्थितीत राञी १२ वा. शुभमंगल सावधानच्या गजरात विवाह सोहळा संपन्न झाला .

 

जल्लोषांत कावडी विवाह सोहळ्यामध्ये दाखल होतात. पण यावर्षी करोना संकटाच्या पार्श्वभमीवर
सोशल डिस्टन्स ठेवून शितल पाटील- नवरदेव,
अतुल पाटील -नवरी, हेमंत देशमुख - कुरवली, किरण देशपांडे -कुरवली, बडवे  व भोसले 
शासनाच्या आदेशाचे पालन करुन सोशियल डिस्टंसिंग पाळून लग्न विधी पार पाडला. 


  यानिमीत्ताने देशावरचे संकट लवकर विना हानी संपावे असे गावकर्याच्या वतीने शंभु महादेव चरणी साकडे घातले .एवढ्या ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पाडण्यात .

   या वर्षी कोरोनामुळे मंदीर बंद आहे. यंदा फक्त धार्मिक विधी झाले .कोणालाही मंदिरात प्रवेश दिला नाही.एकाही कावडीची मिरवणूक काढण्यात आली नाही. सर्वांनी आपल्या कावडीच्या पूजा आपापल्या घरी केल्या.
 
Top