पंढरपूर : सध्या भारताच्या विविध राज्यात तसेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाने थैमान घातले आहे.अशा परिस्थितीमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी देशामध्ये तसेच महाराष्ट्रात वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्यूट या संस्थेने व या संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या चारही महाविद्यालया तील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून पी.एम.केअर्स फंडाला रु.तीन लाख) व चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड कोविड-१९ ला रु.चार लाख पन्नास हजार इतकी आर्थिक मदत केली आहे.
      
 मागेही केरळ तसेच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या पूर परिस्थितीशी सामना करण्या साठी स्वेरीने मुख्यमंत्री सहायता निधीला भरीव मदत केलेली होती.
 
Top