पंढरपूर : शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने संचार बंदीच्या काळात खत विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन पंढरपुरातील एक जण पशुखाद्याच्या दुकानात तंबाखूची विक्री करत असल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे.
अजूनही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आणि पान मसाला दुकाने सोडून ज्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे,औषधी दुकानात जादा दराने या पदार्थांची विक्री वाढली आहे .अनेकजण रस्त्यावर थुंकत आहेत यात अशिक्षित आहेतच पण सुशिक्षित ही मोठया प्रमाणावर आहेत.या थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे तरी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी कारण हा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.    
   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे हे पंढरपुरातील नवीपेठ मध्ये ज्ञानेश्वर रामचंद्र कुलकर्णी या पशुखाद्य दुकानात अचानकपणे तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दुकानात वैभव विलास कुलकर्णी हजर होते. पुरवठा निरीक्षक शिंदे यांनी दुकानातील मालाची तपासणी केली असता, तंबाखूच्या पुड्या सापडल्या.

सापडलेल्या तंबाखू संदर्भात दुकानदाराला माहिती विचारली, त्याला समर्पक उत्तर देता आले नाही. त्याचबरोबर त्याने त्या तंबाखू पुड्या दुकानात विक्रीसाठी ठेवले असल्याचे पुरवठा निरीक्षक शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे  वैभव कुलकर्णी यांच्याविरुद्ध पुरवठा विभागाने कारवाई केली आहे.
 
Top