मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन वरील तीन महिन्याचे धान्य देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण लोकांना काम नसल्याने हा निर्णय घेणे आवश्यक होते. रेशन सर्व नागरिकांना मिळावे अशी मागणी ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यात केसरी शिधापत्रिकांबाबत देखील नागरिकांना रेशन मिळण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच महाराष्ट्रातील विविध भागात नागरिकांना रेशन मिळण्यात अडचणी निर्माण होत असते त्याचे निराकारण देखील ना.डॉ.गोऱ्हे यांच्या मार्गदर्शना खाली उपसभापती कार्यालय करत असल्याचे चित्र दिसत आहे. यात आज राज्य सरकारने केसरी रेशनकार्ड धारकांनादेखील धान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे व प्रशासनाचे आभार मानले असून निर्णयाचे स्वागत केले आहे. खा. शरद पवार यांनी या रेशनबाबतच्या निर्णयात लक्ष घातले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

  याबाबत अशोक हरणावळ -पुणे मनपा मा.गटनेता, पुणे शिवसेना पदाधिकारी बाळासाहेब भांडे, किरण मोघे,फरीदा लांबे,अरुण शिवकर, भटके-विमुक्त युवा परिषद, श्रमिक मुक्ती संघटना, जन साथी दुष्काळ निवारण मंच तसेच विदर्भ, मराठवाडा येथील स्वयंसेवी संस्था पाठपुरावा करत आहेत.
 
Top