पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक०७/०४/२०२० रोजी गोंधळी गल्ली मौजे भाळवणी, तालुका पंढरपूर येथे नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी पो.हे.कॉ. स्वप्नील बापू वाडदेकर व त्यांच्या सोबतचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे , सहाय्यक पोलीस फौजदार मोरे,पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल थोरात असे जिल्हाधिकारी सोलापूर यांचे संचारबंदीच्या आदेशान्वये पोलीस ठाणे हद्दीतील भाळवणी गावात पेट्रोलिंग करीत असताना यातील आरोपी नंबर एक विनाकारण बाहेर मोटारसायकलवरून फिरताना मिळून आल्याने त्यांची गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात येत असताना फिर्यादीचा भाऊ सुखदेव गायकवाड हा परत त्याचे गाडीवर येऊन फिर्यादिस तुम्ही ,आमची गाडी का पकडली असे म्हणून उद्धट वर्तन केले .त्यावेळी त्यांचेकडे वाहन परवाना नसल्याने त्याची गाडीपण पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस परत जात असताना सुखदेव गायकवाड याचे घरासमोर आलेवर यातील आरोपींनी फिर्यादीचे ताब्यातील गाडी अडवून त्याच्यासोबत असणारे इतर सात ते आठ लोक यांनी मिळून आम्हाला तुम्ही संजय गायकवाड यांची मोटरसायकल का पकडली असे म्हणून वाद घालून धक्काबुक्की करून मला तसेच सोबत असणारे पोलीस कॉन्स्टेबल सूर्वे यांना हातावर व पाठीत मारून शिवीगाळी करून धक्काबुक्की केली आहे. तसेच आम्ही आमचे शासकीय काम करीत असताना यातील नमूद आरोपींनी आम्हास धक्काबुक्की शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केला आहे म्हणून फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खान हे करत आहेत.

आरोपी संजय अनंत गायकवाड ,संध्या सुखदेव गायकवाड,सुखदेव आनंत गायकवाड,लक्ष्मी संजय गायकवाड,विष्णु सदाशिव गायकवाड, दुर्योधन संभाजी गायकवाड व त्यांच्यासोबतचे इतर ७ ते ८ लोक सर्व राहणार भाळवणी, तालुका पंढरपूर यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधि. 2005 चे कलम 51, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे, भा द वि 353,323, 341, 504,143,147,149 188 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संजय अनंत गायकवाड यास अटक केले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
 
Top