हे चौघेजण इस्कॉन मंदिर ,शेगाव दुमाळा, पंढरपूर येथे मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांचा संसर्गाचे उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला नव्हता. संसर्गजन्य रोगाची साथ चालू असताना इतरांच्या जीवितास धोका होईल असा निष्काळजीपणा व हयगयीचे कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे .
आता प्रश्न हा निर्माण होतो आहे की हे चौघेजण पुण्याहून पंढरपूरला जिल्हाबंदी, तालुकाबंदी, संचारबंदी असताना कुठल्या ओळखपत्रावरती पंढरपूरला आले.पंढरपूर येथे त्यांना होमक्वारंटाईन चा शिक्का मारण्यात आला असतानाही ते विलगीकरण कक्षात का राहिले नाहीत.मात्र त्यांच्या या वागणुकीमुळे शेगाव दुमाळा आणि पंढरपूर शहरावर भीतीचे सावट निर्माण झाले आहे.पंढरपूर येथे त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारला असतानाही ते नागरिक मंदिर परिसरात फिरल्यामुळे शेगाव दुमाळा येथील ग्रामस्थ म्हणत आहेत की या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर तसेच त्यांचे सहकारी यांना जिल्ह्या बाहेरून चौघे जण इस्कॉन मंदिर,शेगाव दुमाळा, पंढरपूर येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई केली आणि त्यांना ताब्यात घेतले आहे .