शेळवे,(संभाजी वाघुले )-कोरोना बाधितांचा आकडा देशात व महाराष्टातही वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक व पासेस घेऊन महत्वाच्या सेवा देणारे वगळता सर्व वाहनांना रस्त्यावर फिरण्यास मनाई केलेली आहे.

आता शहरी भागातील मोकाट फिरणार्याच्या गाड्या जप्त केलेल्या आहेतच परंतु आता ग्रामिण भागातही मोकाट फिरणार्याच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत.शेळवे येथील मंदिरात गप्पा मारत बसलेल्या लोकांच्या ३ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

मागील पाच दिवसांपासून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत भंडीशेगाव ,भाळवणी, गादेगाव, वाखरी ,तिसंगी, सोनके ,उंबरगाव, कोर्टी, शेळवे, कौठाळी या गावातुन २३० वाहने मिळून आल्याने  पोलिसांनी ताब्यात घेतले असून या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

   ही कारवाई पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे ,पोहे काॅ.स्वप्नील वाडदेकर ,पो.हे.काॅ आर.टी.जाधव, पो.ना. सय्यद, ए.स.आय मोरे, पो.काँ.सुर्वे या टिमने केली आहे.
 
Top