पंढरपूर,दि.१४/०४/२०२० - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध  उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये थर्मल स्क्रीनिंग गनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. या यंत्राव्दारे शरीरातील तापाची तपासणी करुन कोणी तापाने आजारी  असल्यास त्याची माहिती संकलित केली जाणार असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रीनिंग गनव्दारे तपासणी मोहिम हाती घेण्यात आली असून, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आज थर्मल स्क्रीनिंग गनव्दारे तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणारे, औषध विक्रेते, किराणा व्यापारी, भाजीपाला विक्रेते, प्रसार माध्यमातील प्रतिनिधी आदींची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी  ढोले यांनी सांगितले.

     या तपासणीत तापाची काही लक्षणे आढळून आल्यास संबंधितांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.त्याच्यबरोबर पुढील टप्प्यात शहरा तील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.  तसेच नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.     
 
Top