सोनके,(सुधाकर खरात)- पंढरपूर तालुक्यातील सोनके गावात लाँकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद असून , कडकडीत लाँकडाऊन पाळला जात आहे.करोना व्हायरस covid-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.आतापर्यंत सोलापूर जिल्हा करोनमुक्त होता मात्र आता जिल्ह्यात करोनाचा रुग्णाचा मृत्यू झालामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने  सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी अंमलबजावणी कडक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  

  असे असताना पंढरपूर तालुक्यातील सोनके गावात मात्र लाँकडाऊनला गावकर्‍यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला असून,कडकडीत  लाँकडाऊन पाळला जात आहे.हा उत्स्फूर्तपणे मिळत असून ग्रामस्थ कोरोनाला परतवून लावण्या साठी प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
 
Top