सोलापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १५ टक्के निधी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना "जीवनावश्यक वस्तू"चे वाटप करणेसाठी खर्च करावा - ज्ञानदेव बबन काकडे,जिल्हा समन्वयक, रुग्ण हक्क परिषद सोलापूर
शेळवे,(संभाजी वाघुले)- सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोणा रोगाने थैमान घातल्यामुळे बरेच राज्य, जिल्हा, तालुका लॉक डाऊन केल्यामुळे सर्वांचा रोजगार गेला आहे. रोजगार नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे .गोरगरीब, कष्टकरी जनता उपास मारीने मरू नये म्हणून मी रुग्ण हक्क परिषद सोलापूर जिल्ह्याच्यावतीने आपणास विनंती करीत आहे की, ग्रामपंचायत स्तरावरील दलित वस्ती सुधारणा १५ टक्के निधी सोलापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी अनुसूचित जाती / जमातीतील लोकांना "जीवनावश्यक वस्तू"चे वाटप करण्या साठी खर्च करावा जेणेकरुन गोरगरीब कष्टकरी जनतेची उपासमार होणार नाही. सदरील पत्रांचा आपण गांभीर्याने विचार करुन प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी,ग्रामसेवक यांना वरील निधी खर्च करण्याचे आदेश द्यावेत,अशी निवेदनद्वारे मागणी केली आहे .

यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारीं -पंढरपूर -संभाजी वाघुले ,करमाळा-अंगद देवकते ,माळशिरस- आण्णासाहेब निकंबे , बार्शी - सुर्यकांत चिकणे,मोहोळ- बालाजी शेळके , अक्कलकोट- सुहास सोलनकर ,सोलापुर शहर- रोहीत रासे यांनी याबाबत सहमती दर्शविली आहे.
 
Top