पंढरपूर - आपल्या भागात आपल्या मदतीसाठी देवदुत बनुन शासनाचे प्रतिनीधी घरोघरी फिरत आहे. त्यांना मदत करणे, सहकार्य करणे हि आपली जबाबदारी आहे. शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा शहराचा सर्व्हे करण्याचा सूचना दिल्या आहेत. याची मदत कोरोना आपल्या गावापासून लांब ठेवण्यासाठी होणार आहे. आता ५० ते ६० घरासाठी एक प्रतिनीधी असे शिक्षक व नगरपरिषद प्रतिनीधी असे नियोजन केले आहे. आजपासून या सर्वेला सुरवात झाली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या भागातील प्रतिनीधींना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.  साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्यआधिकारी अनिकेत मनोरकर यांनी केली.


   कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्व नागरिकांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. आपल्या भागातील कोणीही नागरिक आजारी पडले, विषेषतः सर्दी,खोकला,अचानक तीव्र ताप येणे, दम लागणे,श्वास घेताना त्रास होणे अशा नागरिकांना वैद्यकीय मदत आवश्यक आहे. अशा नागरिकांना तपासणीसाठी कॉटेज हॉस्पिटलला नेणे आवश्यक आहे.नागरिकांनी त्वरित शासन प्रतिनीधीला कळवले तर त्वरित तपासणी करता येईल.

      जिवनाश्यक किराणा माल ,भाजीपाला , औषधे आपणास मिळणार आहेत.जिवनाश्यक माल उपलब्ध होण्यासाठी शासन व्यापारी, शेतकर्यांना मदत करत आहे. बरेच दुकानदार नागरिकांच्या हितासाठी घरपोच माल करत आहे. याचा लाभ घ्या, घरी रहा, सुरक्षीत रहा.

         परमेश्वर कृपेने घरी जे अन्न उपलब्ध असेल तेच अन्न सेवन करा. कित्येक लोकांना आपल्या गावी जायचे आहे , ते मधेच अडकले आहेत. बरेच लोक असे आहेत त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही, कित्येक लोकांच्या घरी कामं केल्या शिवाय घरात चुल पेटत नाही. त्यांचे काय हाल होत असतील याचा विचार आपण केला का? असे गरजु लोक शोधुन त्यांना मदत करणे आपली जवाबदारी आहे. मी आपणास आवाहन करतो की गरजु लोक, ज्यांचे हातावरचे पोट आहे, ज्यांना खरोखर मदतीची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मदत करा किंवा आमच्या प्रतीनीधींना निदर्शनास आणून द्या अशी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्यआधिकारी अनिकेत मनोरकर यांनी विनंती केली आहे.
 
Top