नवी दिल्ली - आय.एम.एच्या इशाऱ्यानंतर सरकारने तातडीने पाऊल टाकत डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफवर हल्ला केल्यास कडक शिक्षेची तरतूद असणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, अशी माहितीही जावडेकरांनी दिली.
  
     राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे,अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असा आहे नवा अध्यादेश 
डॉक्टरांवर,आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार ५० हजार ते २ लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद,जर कोणी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवर हल्ला केला तर ३ ते ५ वर्षे शिक्षेची तरतूद, नव्या अध्यादेशा अंतर्गत डॉक्टरांच्या मालमत्तेचं नुकसान केल्यास बाजार मूल्याच्या दुप्पट दंड आकारला जाणार आहे.
 
Top