पुणे,दि ०९/०४/२०२० -पुणे सराफ असोसिएशन च्यावतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ लाख रुपयांचा धनादेश पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सेक्रेटरी अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोलंकी, माणिकलाल बलडोटा, उगम गुंदेचा, गौतम सोलंकी,कांतीलाल ओसवाल, फुलचंद ओसवाल, नेमीचंद कोरीमुथा आदी उपस्थित होते.