कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भटक्या विमुक्त जमाती नागरिकांच्या अडचणी सोडविण्या संबंधात गृह सचिव व सामाजिक न्याय सचिवांना उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे सुचनात्मक पत्र...
मुंबई दि.१:- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनमुळे कामगारांच्या प्रश्न सोडविण्यात यावे याकरिता, दि. २९ मार्च २०२० रोजी भटके-विमुक्त युवा परिषद यांच्या वतीने निवेदन उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना मिळाले. भटक्या विमुक्त जमाती यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यात शहरातून गावाकडे येणाऱ्या या जमातीतील लोकांची योग्य ती आरोग्य विषयक चाचणी घेऊन त्यांना गावात प्रवेश देण्यात यावा यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना जबाबदारी द्यावी. त्याचप्रमाणे परिस्थिती पूर्ण पदावर येईपर्यंत गावात आलेल्या अशा लोकांना पुर्वीच्या वास्तव्यातील शहरातील रेकॉर्डनुसार  धान्य आणि डाळी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत पुरवठा विभागास सूचना देण्याची या पत्रात ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

       शहरातील असंघटित कामगारांना आपण तात्पुरत्या स्वरूपात निवारा म्हणून शाळा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामध्ये भटक्या जमातीतील लोकांना आश्रय द्यावा, त्याच धर्तीवर गावाकडे परतलेल्या भटक्या विमुक्तांचे राहते घर किंवा निवारा यांची दूरवस्था झाली असल्यास गावात तात्पुरता निवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हापरिषद विभागाने तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करण्याबाबत निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहेत.शहरातील भटक्या-विमुक्त समाजांच्या लोकांचे रोजगार बुडाले असल्याने अवस्था वाईट आहे, या समूहाला मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने शासनाने प्रयत्न करण्याची सूचना सदरील पत्रात करण्यात आली आहे.

         अशा लाँकडाऊन परिस्थितीमध्ये भटक्या विमुक्तांचे बेहाल झाली असून गावी परतल्यावर त्यांची अवहेलना होऊ नये आणि त्यांचे मानवी हक्क जपण्यासाठी पोलिस प्रशासन यांनी प्रसंगी पालकांचे भूमिका घेऊन लक्ष घालावे अशा स्पष्ट सूचना देण्यात यावे. याव्यतिरिक्त पतपेढ्यांची आणि खाजगी सावकारांची कर्ज हे आणि असे इतर अनेक स्थानिक आणि विभागीय प्रश्न असणार आहेत. या पातळीवर भटक्या-विमुक्त समाजाच्या स्थानिक संघटना कार्यकर्ते आणि नागरिक यांचे प्रश्न समजावून घेऊन आवश्यक याविषयी विचार व्हावा, असे मुद्दे ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सचिवांना दिलेल्या पत्रात मांडले असून वरील मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
 
Top