नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) -नवीन बोअरवेल्स व बोअरवेल दुरूस्ती व यासाठी लागणारे यंत्र व वाहने यांना अत्यावश्यक बाब म्हणुन परवानगी देण्यात यावी ,अशी मागणी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
  
    ते पुढे म्हणाले ,सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो .उन्हाळयात शेतीसाठी व पिण्याचे पाण्याची नेहमीच टंचाई होत असते. सद्या एप्रील महीना चालु असून जिल्हयात अनेक ठिकाणी विहिरी आटु लागल्या आहेत .सद्या कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन केले आहे . बोअर वेल्स मशिनला परवानगी दिली नाही त्यामुळे शेतकरी बोअर घेऊ शकत नसल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
सबब आपणास विनंती आहे कि सोलापुर जिल्हया तील शेतीसाठी व पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत राहणेसाठी नवीन बोअरवेल घेणे बोअरवेल दुरूस्ती व यासाठी वापरणेत येणारे यंत्र व वाहने यांना अत्यावश्यक बाब म्हणुन काम करणेस परवानगी देणेत यावी अशी मागणी 
डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 
 
Top