भाग -५ वा ........
१८ .आदिनाथ सह .साखर कारखाना  नोंदणी होऊन १८ वर्ष झाले होते .फक्त दर पाच वर्षाने निवडणूक एवढेच मर्यादित  होते .
तत्कालीन आमदार व जेष्ठ नेते कै .नामदेवराव जगतापसाहेब यांनी उजनी येथे सर्वात मोठं  धरणं आणलं .
परीणामी तीन तालुक्यात ऊसाचे  क्षेत्र खूप वाढले .
हे लक्षांत घेऊन नामदार श्री .शरद पवार साहेब यांनी !१८वर्ष धूळ खात पडलेला आदिनाथचा प्रस्ताव उचलून धरला , बजेट मध्ये शासकीय भाग भांडवल व आवश्यक तें परवाने दिले .स्वतः लक्ष दिले .तत्कालीन अर्थमंत्री श्री .सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे पाठबळ मिळाले .जिल्हा सह .बँक  चेयरमन आमदार बाबूराव चकोते  यांनी बँकेद्वारा शेअर्स जमा करण्यास अनमोल सक्रिय सहकार्य दिले .
परिणामी कारखाना उभा राहिला !
दिवंगत साखर संचालक श्री .अप्पासाहेब भुजबळ , तत्कालीन साखर आयुक्त अनिलकुमार लखिना , कृषी संचालक कै .डॉ .एस .के .दोरगे , यांनी खूप सहयोग दिला .
स्थळ अर्थात साईट निवड देखील ना .शरद पवारसाहेब यांनी लक्ष घातल्याने अचूक व योग्य झाली .
या सर्व कामकाजात माझं योगदान खूप निरपेक्ष , निर्मळ , अन मोलाचे हे कोण  नाकारू शकत नाही .तत्कालीन चेअरमन श्री .गोविंद बापू , व्हाईस चेअरमन कै .पी .डी .गांधी ,
संचालक  कै .श्री .पन्नालाल
लूणावत , श्री .दिनकरराव लोंढे , श्री .चुनिलाल जाधवसह सर्व  एकजीव कार्यरत राहिलो .
कारखाना सुरू झाला .मी सत्तेच्या राजकारणातून अलिप्त राहिलो .माझं योगदान सामान्य शेतकरी देखील विनयाने मान्य करतो.
एक मात्र निर्विवाद  सत्य आहे तें म्हणजे ना .शरद पवार यांनाच कारखाना उभारण्याचे श्रेय जाते .
१८.उजनी प्रकल्पामुळे सोलापूर जिल्हा साखर कारखानदारीने ओळखला जातो आहे .ऊसाचे क्षेत्र वाढत गेलं .यांत आम्ही पाणी याविषयी पद्मश्री डॉ .अप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाने कृषी  विभाग व विद्यापीठ यांचे द्वारे ठिबक सिंचन प्रसारित केलं .आज १९८२ पासून सुरू झालेल ठिबक सिंचन आता जवळ जवळ ९० टक्के अडॉप्ट केलं जात आहे .शेतकरीवृंदाने हे नवं तंत्रज्ञान स्वीकृत केलं आहे .यांत आज कोठारी अँग्रो टेक.मोहोळ ,जैन इरिगेशन,जळगाव , फिनोलेक्स पुणे यांनी जिल्ह्यात ठिबक संच प्राधान्याने वितरित केले आहेत ,करत आहेत .
आता ठिबक सिंचन हे आवश्यक हे मान्य झाले आहे .
नुसतं उस नव्हं तर करमाळा तालुक्यात निर्यात प्रधान केळी प्रधान लागवड , प्रक्रिया हे काम २००१ पासून कृषी विभागाचे सहकार्य घेऊनच आम्ही कार्यान्वित केलं आहे .आज याचं चित्र खूप हिरवगार दिसतं आहे .तत्कालीन कृषी आयुक्त श्री .प्रभाकर देशमुख , श्री .लव्हेकर , श्री .उमाकांत दांगट , श्री .विकास देशमुख यांनी व तत्कालीन कृषी संचालक , सहसंचालक , अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारीवृंदव अधिनस्त सर्व कृषी सहाय्यक  यांनी अत्यंत अंतःकरणपूर्वक सहयोग दिला .परीणामी कंदर , वांगी , चिखलठाण  , वाशिन्बे , 
उमरड , मांगी केतूर या बेल्टमध्ये सुमारे २५०० हेक्टर क्षेत्र केळी मध्ये आले आहे .
कंदर येथे श्री .किरण डोके हे एकटे सुमारे ७० -८० कोटी रु .केळी निर्यात करत आहेत .श्री .रंगा शिंदे सुमारे पाच कोटी रु .केळी निर्यात करत आहेत . अन्य व्यापारी देशी बाजार शोधत आहेत .व्यापार करत आहेत. सुमारे तीनशे लहान गाड्या रोज राज्यांत वेगवेगळ्या बाजारात व्यापार करत आहेत .या सर्व कार्यात माझं योगदान हे सार्थकता देणारे आहे .कृषी विज्ञान विस्तार कार्य हा माझ्या योगदानाचा पथदर्शक पाठ आहे .म्हणूच कृषी विज्ञान विस्तार कार्याबद्दल अर्थात मेंदूची मशागत बिना शुल्क करत आहे , येथील शेतकरीवृंदाची कृषी अर्थव्यवस्था उंचावल्याबद्दल राज्य शासनाने  सन २००५ मध्ये कृषीभूषण तर सन २०११ चा रौप्य मोहत्सवी कृषीरत्न पुरस्काराने मला सन्मानींत केलं आहे .यासाठी कृषी परिवार , लोक विकास परिवार यांचे अनमोल,  सक्रिय सहकार्य, सहभाग आहेत.त्यांत शासनाचे प्रशासकीय यंत्रणेने खूप सकारात्मक सहयोग दिला आहे , हे मी अभिमानाने नोंदवू इच्छितो ! या सर्व कार्यात 
तत्कालीन कृषी मंत्री ना.बाळासाहेब थोरात,ना . राधाकृष्ण विखे पाटील यांचे तसेंच कृषी सचिव श्री .गोयल ,त्याचंप्रमाणे कृषी विद्यापीठ,राहुरी यांनीही सहयोग दिलेला मी गौरवाने नमूद करतो ...प्रेरणा स्थान मात्र पद्मश्री डॉ.अप्पासाहेब पवारांच आहेत.
आता कंदर,वांगी,शेटफळ,मलवडी येथे गट शेती व फार्मर प्रोडुसर्स कंपन्या कार्यान्वित केल्या आहेत . राज्यांत एक नंबरने काम प्रगतीपथावर आहे . प्रत्येक कंपनी पथदर्शक काम ऊभारत आहे .....

उर्वरित भाग उद्या 
भाग ६ मध्ये .
 
Top