शहरांमध्ये राहणाऱ्यांनी कोरोनाच्या भिती मुळे आता गावाकडची वाट धरली आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये रोजगारासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत. कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊनची भिती यामुळे त्यांनी गावी परतण्याची निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती निर्माण झालीय. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे जाणाऱ्या सर्वांना प्रवास न करता ज्या शहरांमध्ये आहात तिथेच थांबण्याची विनंती केलीय.

पंतप्रधान म्हणाले, असं केल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती आहे. त्याचबरोबर तुमच्या गावीही धोका वाढतो आहे . यामुळे तुमचे आई वडिलही चिंतेत पडतील. त्यामुळे जिथे आहात तिथेच राहा अशी विनंती त्यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला म्हणजे आज रविवारी ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली होती . नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं होते प्रसार माध्यमांनीही याबाबत माहिती दिली होती तरी ही अनेक विद्वान रस्त्यावर थुंकत फिरत आहेत . 
 
  मात्र आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे .लोक मोठ्या प्रमाणात घरांमध्ये बसून आहेत.
 
Top