पंढरपूर -श्री संत सदर नाम मंदिर प्रतिष्ठान ,श्रीक्षेत्र पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष व श्री संत सद्गुरू सोपान महाराज चौगुले पंढरपूर यांचे परमशिष्य वै ह भ प दिगंबर महाराज विठ्ठल सरवदे यांना दिनांक ८ मार्च २०२ रोजी सायंकाळी देवाज्ञा झाली. त्यांनी नाम मंदिराची स्थापना करून श्री विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार येथे दर एकादशी निमित्त प्रसादाचे वाटप तसेच दर दिवाळीच्या सणा निमित्त वस्त्रदान वाटप करण्याचा उपक्रम चालू केला होता .सर्वांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असत. रामलिंग दिगंबर सरवदे ,पंचायत समिती, पंढरपूर वरिष्ठ सहाय्यक यांचे ते वडिल होते .दिगंबर महाराज सरवदे यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे
 
Top