आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
(AB-PMJAY): या योजने अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेत आलेली आहे.

सदर समितीमध्ये जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्यअधिकारी,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा प्रतिनिधी,सर्व मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी  .NULM CPO(महानगरपालिका ),माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रतिनिधी,जिल्हा प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळ ,व जिल्हा प्रशासन अधिकारी हे प्रतिनिधि आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना   :- सदर योजनेमध्ये ज्या व्यक्तीचे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्व व्यक्तींना वरील योजने मध्ये एकूण ९७१ आजारावर मोफत उपचार करणेत येत आहेत .पैकी ८३९ आजारावरील  उपचार हे नगर परिषद पंढरपूर परीक्षेत्रात समर्थ, सेवा,लाइफलाईन,जनकल्याण ,गणपती, नवजीवन या खाजगी हॉस्पिटलमध्ये करणेत  येतात व १३१ उपचार हे सिव्हील हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर  येथे करणेत येतात.त्यासाठी १.५ लाखाची तरतूद शासन पातळीवरून करणेत आलेली आहे. 

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY): या योजने अंतर्गत १३०० आजारावर ५ लाख  रकमेची तरतूद शासनाने  केलेली आहे .या योजने अंतर्गत गोल्डन कार्ड काढावयाचे असून,आपण सार्वजनिक सेवा केंद्र (COMMON SERVICE CENTERr) यांचेशी सपंर्क साधावा.तसेच वरील हॉस्पिटल मध्येही गोल्डन कार्ड काढून मिळेल.नगरपरिषद पंढरपूर यांचेवतीने नगरपालिका सभागृह येथे आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY): या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड काढणेची सुविधा केलेली आहे. वार्डनिहाय यादी नगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे. तरी सदर योजनेचा लाभ पंढरपूर नगरपालिका परीक्षेत्रा मधील लोकानी घ्यावा,असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी केले आहे.

गोल्डन कार्ड काढणेसाठी आवश्यक कागदपत्रे
     
 लाभधारकास पोस्टाने मिळालेले पंतप्रधान       
    आरोग्य योजनेचे कार्ड 
     रेशन कार्ड
     आधार कार्ड
     स्वतःचा मोबाईल नंबर
 
Top