पंढरपूर,(प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील भौतिक व शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल रोपळे गावचे सुपुत्र व पिंपरी चिंचवड येथील नगर भू मापन अधिकारी शिवाजी भोसले यांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने विशेष गौरव करण्यात आला.
 सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी भोसले यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, रोपळे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन भोसले, जनक भोसले, मुख्याध्यापक बिभीषण पाटील, अतुल भोसले, प्रदीप भोसले, आदी उपस्थित होते. 
 भूमापन अधिकारी शिवाजी भोसले यांनी गावच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून शाळेतील विद्यार्थ्यां साठी आरो फिल्टर, दहा संगणक, शैक्षणिक साहित्य, बेंचेस, इतर अनेक शैक्षणिक उपक्रमा साठी लागणारे सहाय्य करण्यात आले असून त्यामुळे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासामध्ये गतीमान प्रगती दिसत आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आज विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या गौरवाबद्दल अधिकारी आणि नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे. 
  गौरवमूर्ती शिवाजी भोसले म्हणाले की, रयतच्या वतीने करण्यात आलेला हा सन्मान आपला सर्वोच्च सन्मान असून यापुढील काळातही शाळा व गावच्या गतीमान विकासासाठी प्रयत्नशील राहू.
 
Top