पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील ‘कर्मवीर ग्रंथालया’च्या ग्रंथपाल श्रीमती विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ विषयाची पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. ‘Development of Human Resource in ICT Environment: An Analytical Study of College Libraries Affiliated to Solapur University, Solapur.’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी.चा प्रबंध विद्यापीठास सादर केला.या संशोधनासाठी कलबुर्गी येथील गुलबर्गा विद्यापीठातील ग्रंथपाल डॉ.सुरेश जांगे यांचे मार्गदर्शन लाभले. 

श्रीमती विनया पाटील यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरम तथा महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे, पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, प्राचार्य जे.जी.जाधव,प्राचार्य डॉ. डी.जे.साळुंखे, डॉ.राजेंद्र जाधव,प्राचार्य सुग्रीव गोरे व राजूबापू पाटील यांनी अभिनंदन केले. 

  यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमधून त्यांचे संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या संशोधनासाठी प्रा.सदाशिव मोरे,राजू मोरे व अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.
 
Top