नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)- राजश्री शाहु स्मारक कोल्हापूर येथे रविवार दि ०८/०३/२०२० या ठिकाणी ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गरूडझेप कार्यगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
प्रा. तौहिद मुजावर यांचे 'मनशांती हा यशाचा मूलमंत्र' या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.
यावेळी प्रा.डॉ.स्मिता गिरी यांच्या 'काव्य-विभोरी ' या कविता संग्रहाचे व दै.झुंजार सेनापती यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी सौ.स्मिता लंगडे,डॉ.लक्ष्मी भारती, सौ.अरूंधती महाडिक ,सौ.पुजा कदम,कु.जयश्री चव्हाण, डॉ.राजेंद्र पाटील,कँप्टन गणपतराव घोडके,प्रा.तौहिद मुजावर, प्रा.डॉ.महेशकुमार मोटे आदी कर्तृत्ववान व्यक्तींना मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ईगल फौंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, शेखर सुर्यवंशी,प्रकाश वंजोळे, प्रा.तुकाराम पाटील ,सुभाष भोसले, दिपक पोतदार,सौ.श्रद्धा पाटील,अशोक शिंदे, कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी ,तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचीन बैरागी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय नवले,रायगड संपर्कप्रमुख संजय गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.