ट्विट केले आहे.
सध्या देशावर कोरोनाच संकट घोंगावत आहे. महाराष्ट्र शासन तुमची सर्वतोपरी काळजी घेत आहे.आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील आपणास हेच सांगेल की,तुम्ही देखील या संकट काळात संपूर्ण खबरदारी घ्या. प्रशासनाला सहकार्य करा असे ट्विट सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. यावेळी राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. यावर आपल्याला एकाही महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे .
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाला इतर ३००० पाहुण्यांसमवेत हजेरी लावतात.देश मोठ्या संकटाशी सामना करत असताना एका राज्याचा मुख्यमंत्री इतका बेजबाबदार कसा वागू शकतो ? महाराष्ट्र आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो,असेही सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिपादन केले आहे.