पंढरपूर :-येथील श्री रुक्मिणी विद्यापीठात पर्यावरणपूरक होळी व स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी बीजगोळे तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
     

श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या सर्वेसर्वा सौ. सुनेत्रताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील कवी रविराज सोनार यांनी ही कार्यशाळा घेतली.काळी माती, गाईचे शेंण ,भुसा वापरून त्यामध्ये देशी बिया कारंजे,सीताफळ, कडुलिंब, इतर यासारख्या अनेक बिया वापरून हे बीजगोळे तयार केले .यामध्ये मातीत करावयाचे असल्याने मुले,शिक्षक हे सर्वजण रमून गेले होते. ४-५ दिवस हे गोळे सुकल्यावर पावसाळ्यापूर्वी उजाड जमिनीवर फेकण्यात येणार आहेत. यापासून सुंदर वनराई तयार होईल असा आशावाद रविराज सोनार यांनी व्यक्त केला.
 यावेळी सौ.सुनेत्रताई पवार म्हणाल्या की, स्व. पतंगराव कदम यांनी त्यांच्या काळात वन खाते अतिशय चांगले सांभाळून वने वाढवली आणि त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त वृक्षलागवडीचा , बीज गोळे तयार करून आपण अभिवादन करत आहोत.
  शालेय परिसरातील कचऱ्याची होळी यावेळी करण्यात आली.प्लास्टिकमुक्त ,वृक्षतोड , लाकडे यांचा वापर न करता परिसरातील केरकचरा, वाळलेल्या झाडाची पाने यांचा वापर करून ही होळी करण्यात आली .यावेळी मुलांना कोरोना व्हायरस बद्दल वैयक्तिक, परिसर स्वच्छतेची माहिती देण्यात आली आणि रंगपंचमी न खेळण्याची शपथ घेण्यात आली.
  सर्व विभाग प्रमुख ,प्राचार्य सौ.नंदिनी गायकवाड मॅडम, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भोसले मॅडम,शिशु मुख्याध्यापिका सौ. माधुरी शहाणे मॅडम उपस्थित होत्या .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलनदीप टापरे सर,पांडुरंग शिंदे सर , संतोष कवडे सर , सोमनाथ साळुंखे सर, प्रमोद हुंगे-पाटील सर, महेश भोसले सर , सौ.कदम मॅडम, सौ.पांढरे मॅडम, सौ.खडतरे मॅडम, सौ.यादव मॅडम ,सौ.बेलपत्रे मॅडम, सौ.लोखंडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
 
Top