उद्या दिनांक १३/०३/२०२० रोजी फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंग पंचमी आहे. रंगपंचमी सणा निमीत्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने दरवर्षी रंगाची उधळण करीत सवाद्य मिरवणुक काढण्याची प्रथा आहे. या मिरवणुकीमध्ये तसेच मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रंगांचा व पाण्याचा वापर करत रंगपंचमी साजरी केली जाते.
  
   तथापि यावर्षी करोना व्हायरस प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या रंगांची
उधळण न करता पारंपरिक पध्दतीने मिरवणुक काढुन तथा परंपरेनुसार व शास्त्रास अनुसरून विठ्ठल रुक्मिणी मातेकडे नैसर्गीक रंग लाऊन अत्यंत साधेपणाने रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. 

  मंदिर समितीतर्फे भाविकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनीही मंदिरामध्ये रंगांचा व पाण्याचा वापर टाळावा व मंदिर समितीस सहकार्य करावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. 
 
Top