मंगळवारचा आठवडे बाजार बंद राहणार

    पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये करोना व्हायरस विषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठे डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या रुग्णालया मध्ये एखादा बाधीत व्यक्ती आढळल्यास त्याच्या वर प्रथमोपचार होण्याच्या दृष्टाने वैद्यकीय अधिकारी यांना पुरेसा औषधाचा साठा ठेवण्या बाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शहरातील घंटागाडी द्वारे व माहिती पत्रकाद्वारे नागरीकांपर्यंत सुचना पोहचविलेल्या आहेत. शहरातील औषध विक्रेत्यांची बैठक घेवुन त्यांनादेखील सुचना देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक वार्डनिहाय स्वच्छता व औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक, खाजगी रुग्णालय यांना सतर्क राहण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. शहरात एकुण २४ मंगल कार्यालये असुन त्यांनाही आपातकालिन वेळेत मदत करण्याची सुचना देण्यात आलेली आहे. शहरामध्ये नगरपरिषदेच्या १४, खाजगी ३०, माध्यमिक शाळा २३ व ५ महाविद्यालये असुन त्यांनाही ३१ मार्च २०२० अखेर सुट्टी देण्याबाबत प्रशासन अधिकारी नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाकडुन यांचेमार्फत आदेश बजावण्यात आलेले आहेत. शहरातील एकुण ७८ हॉस्पिटल, ८ आयसीयु असुन वैद्यकीय अधिकारी व इंडियन मेडिकल असोशिएशन मार्फत सतर्क राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. पंढरपूर शहरामध्ये प्रत्येक मंगळवारी आठवडे बाजार भरला जातो. तो रद्द करण्यात आला आहे. शहरातील काही जागांमध्ये, मठांमध्ये शिकवणी घेतली जाते. अशा शिकवणी घेणा-या शिक्षकांना व जागा मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शहरातील जलतरण तलाव बंद करण्यात आलेला आहे. मॉल, प्रशिक्षण केंद्र,डीव्हीपी चित्रपट गृह, व्यायाम शाळा (जिम) यांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे. शहरात होणा-या यात्रा, समारंभ, उत्सव यांसारख्या कार्यक्रमांनासुद्धा परवानगी नाकारण्यात येत आहे. तरी शहरातील नागरीकांनी करोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याकरिता व प्रदुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव व आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी केले आहे. 
 
Top