पुढील काही दिवस , खुप गंभीर आहेत

पैसे देऊन आपणास घर विकत घेता येईल ,
त्या घराचा मजबूत उंबरा बसवता येईल ,
पण ते लोक कुठुन आणणार ज्यामुळे
आपल्या घराला घरपण होते
कोणी आपली वाट पाहत असायचा
बाहेरुन आल्यावर आपले स्वागत व्हायचे

वेळ हि आयुष्यात खुप महत्वाची असते
एकदा वेळ निघुन गेली ,निर्णय चुकले
माणुस सर्व गमवतो

चुकीला माफी असते कारण
ती आपल्या हातून नकळत घडते.
पण आपण जि चुक आपण
जाणुन बुजुन करतो त्याला माफी नसते.

आज आपण तिचं चुक करत आहोत
आपणास सांगितले जाते पुढील काही दिवस
बाहेर पडु नका? बाहेर पडु नका?
बाहेर पडुच नका?


तरी आपण बाहेर पडतच असतो
पडतच असतो ,पडतच असतो
तर आपल्या चुकिला माफी नाही हे लक्षात ठेवा.
व आपल्या बरोबर कधी कोरोना आपल्या घरात शिरेल व तो आपल्या घराचे किती भाग करेल मोजता येणार नाही.
घराला उंबरा असला कि तो घराचे रक्षण करतो, कोरोना नावाचा वायरस घरा बाहेर फिरत आहे.
तो खतरनाक आहे पण
त्याची एकच कमजोरी स्वभिमानी तेवढाच आहे
स्वतःहून कधीच तो आपल्या घरात येत नाही,
आपल्या बरोबरच तो आपल्या घरात येऊ शकतो
दुसरा मार्गच नाही , तो उडू शकत नाही
तो चालु शकत नाही


आपला आधार घेऊन तो आपल्या घरात येतो
सुरवातीला गोड,गोड राहतो,त्याची ताकद वाढवतो
घरात ही जेथे जेथे आपण त्याला नेतो तेथे तेथे तो आपल्या घरात त्याचे घर बनवतो

त्याचे एकच ध्यास आणि तो आहे 
त्याला हाथ लावेल त्याचा सर्वनाश सर्वनाश
सर्वनाश

आपल्यास वारंवार सांगितले जाते बाहेरील जिल्ह्यातून, पुणे तुन, मुंबई तुन, परदेशातून 
कोणी आलंय का?
आले असल्यास, पूर्ण परिवारापासून
१४ दिवस लांब ठेवा लांब ठेवा लांबच ठेवा 
तरी का आपण ऐकत नाही 
मनातल्या मनात म्हणतो विचार करु
विचार करु, विचारच करु

निश्चितच तो निरोगी असेल पण चुकुन त्याच्या बरोबर कोरोना वायरस आपल्या घरी आला असेल तर तो वायरस पुर्ण घर पोखरल्याशिवाय राहणार नाही.
वेळीच सावध व्हा , 
बाहेर गावातुन आलेल्या कुटुंबातील सदस्यांना काहीच दिवस वेळी खोली, वेगळा टॉवेल , वेगळी भांडी, वेगळा बाथरुम वापरायला द्या.

कोणी तरी म्हटले आहे , सब्र का फल
मिठा होता है , मिठा होता है
मिठाही होता है

तरी आपण का सब्र का करत नाही. 
रामाने १४ वर्ष वनवास पुर्ण केला, का आपण आपल्या लाडक्यांना १४ च दिवस वेगळे ठेउ शकत नाही.

तो जर एकटा आला असता तर त्याचे स्वागतच होते, पण तो एकटा आला की कोरोनाला घेऊन आलाय यांची आपणास माहिती आहे का?
एवढ्या कष्टाने आपण कुटुंब उभे केले ,
एका क्षणात आपण अंधारात चालायला निघालो, ती वाट कोणाची आहे,कोठे जाते आपणास माहित नाही.
आजून वेळ गेलेली नाही , आपण आपल्या चुका दुरुस्त करून, आपल्या परिवाराला 
गंभीर संकटापासून वाचवु शकतो

पोलीस प्रत्येक दुकानदार ला जिव तोडुन वारंवार सांगतात दुकानात गर्दी करु नका ,गर्दी करु नका
गर्दी करु नका
प्रत्येक ग्राहक व दुकांनदार यांच्यामध्ये सुरक्षीत
आंतर ठेवा ,आंतर ठेवा ,आंतर ठेवा
पोलीस त्याचे कर्तव्य बजावतात ,
का बरं आपण त्याचे ऐकत नाही. 
चूकून आपल्या माध्यमातून आपल्याबरोबर कोरोना आपल्या घरी पोहचला.
तो आपल्या लाडक्या परिवाराचे काय हाल करेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही.
देव प्रत्येकाला चुका दुरुस्त करायला वेळ देतो
पण आपण विचार करतो आज देवच 
दिसत नाही , दिसत नाही ,दिसत नाही
आपल्या आडाणीपणाचा 
देवालाही कंटाळा आला असावा
वेळ निघुन गेली तर प्रत्येक चुका दुरुस्त होत नाहीत.

 चिनमध्ये पाहिले काय झाल,
 आपल्याला गंमतच वाटली

 इटलीमध्ये पाहिले, काय झाल,
 आपल्याला गंमतच वाटली

 अमेरिकेत पाहिले काय काय झाल,
 आपल्याला गंमतच वाटली

मित्रांनो या दरम्यान आता आपलीच गमंत व्हायला लागली याची जाणीव असु द्या.
इतर देशांनी केलेल्या चुकींपासुन 
आपण शाहणे व्हायला पाहिजे,
प्रत्येक चुक दुरुस्त होत नाही हे लक्षात ठेवा.

पुढील काही दिवस घरा बाहेर पडुन नका
वेळ आजून आपल्या हातात आहे
शहाणे व्हा ,  शहाणे व्हा , शहाणे व्हा.

विवेक परदेशी
आरोग्य समिती सभापती,पंढरपूर
 
Top