पंढरपूर,(विजय काळे )-सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आपल्या राज्यातील नागरिकांना संसर्ग होवू नये म्हणून राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून संपूर्ण राज्यातील शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.तसेच खाजगी शिकवणी वर्ग, मोठ्या शहरातील मॉल, चित्रपटगृहे, जलतरण तलाव यांनाही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसचा फटका तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरलाही बसला आहे.श्री विठ्ठल दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या आता रोडावली असून त्याचा फटका शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. 

सध्या पंढरपूरातील भाविकांची गर्दी कमी झाल्याने टांगा,रिक्षा व्यावसायिकांवरही संकट आले आहे.
दररोज कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून विविध माध्यमातून करण्यात येत आहे.
 
Top