शेळवे,(संभाजी वाघुले) - पंढरपूरसह अन्य बंद अवस्थेतील पर्जनमापक यंञावरील अहवाला नुसार पंढरपूरसह भंडीशेगाव, भाळवणी सर्कल मधील गावे पिक विम्यापासून वंचित राहिलेली आहेत.

भंडीशेगाव ,भाळवणी सर्कलसह अनेक गावातील शेतकर्याची आर्थिक अवस्था हालाखिची असतानाही आपल्या फाटक्या संसाराला व शेतीला थोडाफार हातभार लागेल ह्या भोळ्या आशेने सर्व शेतकरी वर्गाने पैशाची जुळवाजुळव करुन पिक विमा भरला.

या भरलेल्या पिकविम्यांची रक्कम कधी जमा होतेय याकडेच सर्व शेतकर्यांचे लक्ष होते. काही जाणकार शेतकर्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधून पिकविम्याची चौकशी केली असता पंढरपूर , भंडीशेगाव व भाळवणी सर्कलने पर्जन्य मापकाच्या अहवलावरुन पिक विम्यांतुन वगळल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे पंढरपूर , भंडीशेगाव ,भाळवणी सर्कलमधील शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्त होत आहे. कारण पिकविमा हा बॅकमध्ये किंवा महाईसेवा केंद्रात भरलेला असला तरी अहवालानुसार जे भाग वगळलेले आहेत अशा भागांना पिकविमा रक्कम मिळणार नसल्याचे हेल्पलाईन अधिकारी यांनी सांगितले आहे.

जे सर्कल अहवालानुसार पिकविमा रक्कम मंजुर झालेला आहे तो विमा टक्केवारी नुसार नसुन तो पिकविमा हेक्टरी असल्याचेही पिकविमा कंपनीच्या हेल्पलाईन अधिकारी यांनी सांगितले.

बंद अवस्थेतील पर्जन्यमापकाचा अहवाल कसा दिला तसेच बंद अवस्थेतील पर्जन्यमापका वरुन अहवाल तयार करून दिला असेल तर अशा अधिकार्यावर कडक कारवाई शासनाने करावी तसेच पिकविम्या पासून वंचित शेतकर्यांना पिक विम्यांची रक्कम लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
 
Top