पंढरपूर,(प्रतिनिधी)-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे.हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी निर्जंतुकीकरणाकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषध फवारणी करणे आवश्यक आहे ,मात्र पंढरपूर शहरातील वाढती लोकसंख्या पाहता पंढरपूर नगरपालिकेची आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडत आहे व एका वेळी सगळीकडे पोहोचणे अशक्य होत असल्याने याचा विचार करून पंढरपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विक्रमराजे कदम यांनी स्वत: तीन ट्रॅक्टर मागवून घेऊन सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूर शहरातील उपनगरातील द.ह.कवठेकर शाळा परिसर,श्रीरामनगर,जैन मंदिर वीरसागरनगर, परिसर ,छत्रपती संभाजीनगर ,मार्केट यार्ड परिसर, गाताडे प्लाॅट व पोलिस काॅलनी मागील बाजूस सायंकाळी ५.०० ते ६.४० यावेळेत औषध फवारणी करून घेतली.

  सदरचा औषध फवारणीचा उपक्रम राबविण्या साठी साप्ताहिक धन्यवादचे संपादक शंकरराव कदम व अ.भा.मराठा महासंघाचे युवक जिल्हा ध्यक्ष सुरज भोसले यांच्या सहकार्याने पार पडला.
पत्रकार विक्रमराजे कदम हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होवून आपला समाज सेवेचा वारसा जपत असतात.पंढरपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विक्रमराजे कदम व त्यांचे छोटे बंधू 
रूतिकराजे कदम यांनी दोन ट्रॅक्टरमध्ये बसून व एक इतर यासह एकूण तीन ट्रॅक्टरसह फवारणी करून घेतली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

  अनेकांनी फोन करून आपण सामाजिक बांधिलकी जपून या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्याबद्दल आभार मानले आहेत, असेही पत्रकार विक्रमराजे कदम यांनी सांगितले.
 
Top