खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी न्यायालयाची फसवणूक करून मिळविलेला जामीन रद्द होणार
समाजसेवक राहुल किसन कांडगे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

मुंबई दि.१६ - खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जुलै २०१८ मध्ये चाकण दंगली प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यात दिलीप मोहितेंना अटक पूर्व जामीन खेड न्यायालयाने नाकारला होता. त्यामुळे दिलीप मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जासोबत त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि ज्या एफ आय आर मध्ये त्यांचे नाव नाही असा एफ आय आर सादर केला . त्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक पूर्व जमीन मंजूर केला. या प्रकरणी समाजसेवक राहुल किसन कांडगे यांनी आमदार दिलीप मोहिते यांनी न्यायालयाची कशी फसवणूक केली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्या बाबतची कागदपत्रे एफ आय आर कॉपी आदी सादर करून न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जाची न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाची फसवणूक करण्याचे  प्रकरण गंभीर असून याबाबत न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावले आहे, अशी माहिती राहुल किसन कांडगे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

   विशेष बाब म्हणजे विधानसभा उमेदवारी अर्ज भरताना  चाकण दंगल प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिलीप मोहिते यांनी दिली आहे. ते प्रतिज्ञापत्रही राहुल कांडगे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. 
 
Top