इंदापूर - शनिवार दिनांक १४ मार्च २०२० रोजी
श्री सन्मती सेवा दल नूतन संचालक मंडळ व पदाधिकारी पदग्रहण सोहळा इंदापूर ,जिल्हा पुणे येथे पार पडला.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भ.महावीर, प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरण व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलन झाले.


यावेळी व्यासपीठावर डॉ.विकास शहा, डॉ.श्रेणिक शहा,डॉ.रावसाहेब पाटील,पत्रकार सलीमभाई पटेल, इंद्रजीत फडे, दीपक व्होरा, श्रीमती कांताकिनी व्होरा, श्रीमती. कोमल गांधी, मीना दोशी, सौ.चेलना व्होरा,सौ. नम्रता शहा आदि मान्यवर उपस्थित होते.


त्यानंतर सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी नूतन संचालक मंडळ व पदाधिकारी यांचा शपथ विधी केला.


*नुतन पदाधिकारी २०२०-२१*

अध्यक्ष- संदेश रविंद्र गांधी, भिमानगर.
उपाध्यक्ष-विरेंद्र सुरेश दोभाडा,अकलूज.
सचिव- निलेश अजित दोशी, फलटण.
सहसचिव- यश भारत शहा, बार्शी.
खजिनदार-रत्नकुमार राजकुमार फडे,अकलूज. सहखजिनदार-चंद्रसेन पृथ्वीराज डूडू, नातेपूते
प्रसिद्धी प्रमुख- धिरज विलास गांधी,महूद.
सहप्रसिद्धी प्रमुख-प्रविण हिरालाल दोशी,म्हसवड.


यानंतर सन २०१९ - २० संचालक व पदाधिकारी यांना मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.मावळते अध्यक्ष मयुर गांधी,अकलूज यांना "विशेष सन्मानपत्र" देऊन सन्मानित करण्यात आले.


श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान २० २० सहभागी स्वयंसेवकांना याप्रसंगी अभिनंदन पत्र देण्यात आले.


संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विकास शहा यांनी सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियानचे कौतुक केले त्याच बरोबर आपल्या परिसरातील मंदिरांची देखील स्वच्छता अभियान करण्याची गरज आहे असे सांगितले.

डॉ. श्रेणिक शहा यांनी सर्व माजी अध्यक्ष तसेच नूतन अध्यक्ष या सर्वांची नावे शब्दाच्या माळेत गुंफत सन्मती सेवा दलाच्या कार्याचा दरवळ उपस्थितांपर्यंत पोहोचवला.

डॉ.रावसाहेब पाटील यांनी उपस्थितांना तसेच श्री सन्मती सेवा दलाच्या सर्व युवकांना मार्गदर्शन केले. वरील तिन्ही मार्गदर्शकांनी संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक करत नूतन अध्यक्ष संदेश गांधी आणि त्यांच्या टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

   प्राचीन मंदिर जीर्णोद्धार निधी संकलन करीता दानपेटी मान्यवरांचे हस्ते अनावरण करुन इच्छुक व्यक्तींना त्याचे वाटप करण्यात आले.

   कार्यक्रमाला
 माजी अध्यक्ष जिनेंद्र दोशी,डाॅ.राजेश शहा तसेच पत्रकार सम्मेद शहा, सुनिल शहा आणि  श्री सन्मती सेवा दलाचे सभासद उपस्थित होते.   

         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, इंदापूर व टेंभुर्णी येथील सदस्य यांनी परिश्रम घेतले.

  सुत्रसंचालन मनिष शहा,अमित व्होरा यांनी केले.
 
Top