पंढरपूर,(प्रतिनिधी)-पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहराच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्यावतीने स्वखर्चाने १६ ब्लोअर मशीनद्वारे औषधाची फवारणी चालू करण्यात आली आहे .
पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकी करणाकरिता अग्निशामक टँकर,१२ हातपंप ,३ ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.सोलापूर जिल्ह्याचे आ.प्रशांत परिचारक,पंढरपूर नगराध्यक्षा साधना ताई नागेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू करण्यात आले होते. मात्र पंढरपूर शहराची हद्द विचारत घेता ही यंत्रणा अपुरी पडत होती म्हणून आज माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी स्व खर्चाने १६ ब्लोअर मशीन पंढरपूर नगरपरिषदेला उपलब्ध करुन दिल्या आहेत .

    संपुर्ण शहरातील प्रभागात निर्जंतुकीकरणा करिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात येणार आहे . 

  यावेळी सदर ब्लोअर मशीन नगरपरिषदला देताना माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले , पक्षनेते गुरुदास अभ्यंकर ,नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, नरेंद्र डांगे यांच्यासह सर्व आरोग्य अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
 
Top