पंढरपूर ,दि.१७/०३/२०२० - कोरोना विषाणुला प्र￸तिबंधात्मक उपाय योजनेसाठी दिनाकं १७ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन बंद राहणार आहे . 
 
आज दिनांक १७/०३/२०२० रोजी श्रींची धुपाआरती झालेनंतर सायंकाळी ७.०० वाजले पासुन ते दिनांक ३१/०३/२०२० श्रीं चे दर्शन बंद राहणार आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने दर्शन बंद कालावधीत श्रींचे दैनंंदिन नित्योपचार सुरू राहणार आहेत आणि अन्नछत्र बंद राहणार आहे. श्रींच्या नित्यपुजा व चैत्र पाडव्यापासून सुरु होणार्‍या चंदन ऊटी पुजा मंदिरे समितीच्यावतीने करण्यात येणार आहेत . 
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची परिवार देवता मंदिरेही दैनंदिन नित्योपचारानंतर बंद  राहणार आहेत अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे सहअध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजता मंदिर कार्यालयात  पत्रकार परिषदेमध्ये दिली .

   यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी व प्रांताधिकारी सचिन ढोले , मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे,शकुंतला नडगीरे,मंदिर समितीचे  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते
 
Top