नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :सन १९६७-६८ च्या नातेपुते हायस्कूलच्या इ. १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच मांडवे येथे संपन्न झाला.


  या मेळाव्याचे उद्घाटन सु.वा. कुलकर्णी यांनी केले .


यावेळी नातेपुते येथील धैर्यशील देशमुख यांनी सध्या ७० वयॊमान असणाऱ्या या ज्येष्ठ व्यक्तींना नामस्मरण व व्यसनमुक्ती या संबंधी प्रबोधन केले.  गुरुवर्य विठ्ठलराव पाटील, सु.वा. कुलकर्णी, सुरेश वहीकर या गुरुजनांसोबत डॉ. एम.के. इनामदार व त्यावेळचे त्यांचे सुमारे ५० शालेय सहकारी त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.
  

कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन अनंतलाल दोशी, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी व रत्नत्रय शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक व शिक्षकवृंदाने केले होते.
 
Top